शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

महाडिकसाहेब, भाजपमध्ये या, मंत्री करू! सुरेश हाळवणकर यांचे थेट आवतण : ‘भीमा प्रदर्शन’ सांगता समारंभात टोलेबाजी; पशु-पक्षी पालकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 01:18 IST

कोल्हापूर : ‘संसदेमधील अष्टपैलू खासदार’ आहात हे कामातून सिद्ध केले. आता दिशा बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात हात घालून काम करा, मंत्रिपदाने सन्मानित करतो, असे थेट

कोल्हापूर : ‘संसदेमधील अष्टपैलू खासदार’ आहात हे कामातून सिद्ध केले. आता दिशा बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात हात घालून काम करा, मंत्रिपदाने सन्मानित करतो, असे थेट आवतण सोमवारी भाजपचे महामंत्री आमदार सुरेश हाळवणकर यांनी खासदार धनंजय महाडिक यांना दिले, तर प्रदर्शनासाठी मेरी वेदर मैदान मिळू नये, असा खोडा काही मंडळींनी घातला, पण ‘सच्चाई की अखेर जित होती हैं’, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मदतीने येथेच प्रदर्शन भरविले, असा टोला खासदार महाडिक यांनी लगावला.

भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभात हाळवणकर, महाडिक यांच्यासह ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके यांनी राजकीय टोलेबाजी केली. हाळवणकर म्हणाले, शेतकºयांच्या हृदयातील तुम्ही खासदार आहात. दिशा बदलून नरेंद्र मोदी यांच्या हातात हात द्या, मग निकालाची चिंता करू नका. आपण पक्षाचा महामंत्री आहे, जबाबदारीने बोलतो, तुम्ही भाजपमध्ये यावे मंत्रिपदाने सन्मानित करू, असे आपल्या व मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मनात आहे.’

हाळवणकर यांच्या आवतणावर केवळ हसून दाद देत खासदार महाडिक म्हणाले, अकरा वर्षे मेरी वेदरवर प्रदर्शन भरवतोय, पण यावर्षी काहींनी खोडा घातला. महाडिक कुटुंबीय पैसे मिळविण्यासाठी प्रदर्शन भरवत नाहीत, आम्ही स्वत:च्या खिशातील कोट्यवधी रुपये खर्च करतो.’अरुण नरके म्हणाले, संसदेमध्ये नंबर वन, कामातही अग्रेसर हे तुम्हाला जमते कसे? तुम्ही अफलातून खासदार असून, असा खासदार होणे नाही. 

‘राष्ट्रवादी’ची पाठप्रदर्शनाच्या उद्घाटनाला आमदार हसन मुश्रीफ आले नव्हते, सांगता समारंभाला राष्टÑवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांना निमंत्रण होते. तेही न आल्याने राष्टÑवादीच्या नेत्यांनी अघोषित बहिष्कार टाकला का? अशी चर्चा सुरू होती.नेत्यांमध्ये रेड्याचीच चर्चा!प्रदर्शनात नाचणारा घोडा आणला जातो, पण तुम्ही सन २०१९ ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून नऊ कोटींचा रेडा आणल्याची नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे हाळवणकर यांनी सांगितले. त्यावर, मैदान मिळाले नाही म्हणून रेडा आणल्याची चर्चाही आहे, पण येथील दूध उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठीच रेडा आणल्याचा खुलासा खासदार धनंजय महाडिक यांनी केला.हाळवणकर यांचा शेट्टींना टोलाभ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन ‘आप’चे अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले; पण त्यांचेच आमदार लाभाच्या पदापोटी अपात्र ठरले. आपल्या जिल्ह्यातही एकच विषय घेऊन लढणारा नेता आहे, त्यांच्याकडे दुसरा विषयच नाही, हे दुर्दैवी असल्याचा टोला हाळवणकर यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव घेत लगावला.‘गोकुळ’ विरोधातील आवाज बंद‘गोकुळ’वर टीका करून गोरगरिबांची रसद तोडण्याचा प्रयत्न काहींनी केला, त्याला तुम्ही एकच दम दिला आणि त्यांचा ‘गोकुळ’ विरोधातील आवाज बंद झाला, असा टोला हाळवणकर यांनी आमदार सतेज पाटील यांना हाणला.‘भीमा’ कृषी प्रदर्शनाला आठ लाख शेतकºयांनी दिली भेटमहाराष्टÑासह कर्नाटकातील आठ लाख शेतकºयांनी या प्रदर्शनाला भेट दिली. सांगता समारंभात प्रदर्शनातील जातिवंत पशु-पक्षी पालक व शेतकºयांचा गौरव आमदार हाळवणकर यांनी केला.हाळवणकर म्हणाले, ऊसतोडीसाठी आठ-दहा शेतकºयांमध्ये लहान ऊसतोडणी यंत्र खरेदीसाठी केंद्रच्या अनुदानासाठी महाडिक यांनी प्रयत्न करावेत.

खासदार महाडिक म्हणाले, गेल्या साडेतीन वर्षांत कोल्हापुरातील सर्वच प्रश्न मार्गी लावले असून, आठ दिवसांत बास्केट ब्रीजची निविदा निघेल, त्यानंतर दीड वर्षांत कामही पूर्ण होईल. कृत्रिम वीर्य केंद्रासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे पाठपुरावा करु. ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे यांनी मनोगत व्यक्त केले. रामराजे कुपेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, नानासाहेब महाडिक, संजय घाटगे, आयुक्त अभिजित चौधरी, आदी उपस्थित होते.‘